LIVE: मुंबईत भाविकांचा महासागर अन् ‘मोरया’चा गजर! पाहा घरबसल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज मुंबईत सुरू झाली असून, बाप्पाचा हा भव्य सोहळा घरबसल्या LIVE पाहता येणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: Lalbaugcha Rajaच्या विसर्जन मिरवणुकीला आज, 25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरुवात झाली आहे. मुंबईतील या भव्य मिरवणुकीकडे देशभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे. लालबागपासून गिरगाव चौपाटीपर्यंतचा हा प्रवास पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यांवर जमले आहेत.
लालबागच्या राजाची मिरवणूक LIVE कुठे पाहता येईल?
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबागच्या राजाचे ऑनलाइन थेट दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, भाविकांना अधिकृत YouTube, Facebook, Instagram, X, वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून बाप्पाचे दर्शन घेता येते.
लालबागच्या राजाचे LIVE दर्शन:
मिरवणुकीत मोठी गर्दी
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळपासूनच लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. मिरवणूक पुढे गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत असून, विसर्जन सोहळा हा गणेशोत्सवातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक मानला जातो.
