नोकरीचं अमिष, लैंगिक छळ अन् धमक्या; 41 वर्षीय महिलेसोबत काय घडलं?
41 वर्षीय महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्व दिल्लीतील ही घटना असून आरोपी सध्या फरार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नोकरीचं अमिष, लैंगिक छळ अन् नंतर धमक्या
41 वर्षीय महिलेसोबत काय घडलं?
Crime News : पूर्व दिल्लीतील मंडावली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 41 वर्षीय महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गणेश नगर भागातील रहिवासी असलेला आरोपी दीपक बन्सल याच्याशी पीडितेची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. 4 मार्च रोजी नोकरीच्या संदर्भात भेटायला आलेल्या आरोपीने महिलेला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर दुष्कर्म करून त्याचे आक्षेपार्ह चित्रीकरण केले.
चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी
शुद्ध आल्यानंतर पीडित महिलेने या कृत्याला विरोध केला असता, आरोपीने तिला जबर मारहाण केली. आरोपीने पीडितेच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, अंगठी आणि साखळी बळजबरीने काढून घेतली, तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने आपली पोलीस ठाण्यात मोठी ओळख असल्याचे सांगून, "पोलीस किंवा कोणाकडेही तक्रार केल्यास चेहऱ्यावर ॲसिड फेकेन आणि जीवे मारेन," अशी भीती दाखवून महिलेला गप्प राहण्यास भाग पाडले.
हे ही वाचा : व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण 180 अंशात बदललं, आधी सुनेवर ठपका आता वेगळं वळण!
मानसिक त्रास दिवसेंदिवस वाढला
आरोपीच्या या सततच्या धमक्यांमुळे आणि भीतीपोटी पीडित महिला अनेक महिने या अत्याचाराबद्दल कोणालाही काही सांगू शकली नाही. मात्र, आरोपीचा छळ आणि मानसिक त्रास दिवसेंदिवस वाढतच गेल्याने अखेर महिलेने हिंमत एकवटली आणि पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण प्रकार कथन केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मंडावली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध 22 सप्टेंबर रोजी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : दुष्काळावरील चर्चेसाठी अधिवेशन बोलवा, 'त्या' 31 हजार कोटींचा हिशोब द्या; ठाकरेंचे सरकारला बेधडक सवाल
पीडितेचे काउन्सलिंग
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच या तीव्र मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी पीडित महिलेचे समुपदेशन (काउंसलिंग) करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
