दुष्काळावरील चर्चेसाठी अधिवेशन बोलवा, 'त्या' 31 हजार कोटींचा हिशोब द्या; ठाकरेंचे सरकारला बेधडक सवाल
Uddhav Thackeray Press conference : दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करत तातडीने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. कर्जमाफी, पीक विमा, पिण्याचे पाणी, चारा आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्याबाबत पारदर्शक माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तातडीने अधिवेशन बोलवा, 'त्या' 31 हजार कोटींचा हिशोब द्या
ठाकरेंचे सरकारला बेधडक सवाल
Uddhav Thackeray Press conference : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर सरकारने जाहीर केलेल्या 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी प्रत्यक्षात किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली? याचा लेखाजोखा सरकारने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर्षी दुष्काळाची शक्यता आधीपासून व्यक्त होत असताना त्यासाठी सरकारने काय तयारी केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा : फार्महाऊसवर क्रूरतेचा कळस! पोलिसांसह सीआरपीएफ जवानाकडून 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
पाण्याची उपलब्धतेसाठी तातडीने लक्ष देण्याची गरज
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांची पिके करपून गेली असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पाऊस पडला तरी आतापर्यंत नुकसान झालेल्या पिकांना त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ दौरे न करता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा : 'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' ज्ञानेश कुमारांचा दाखला देत राज ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर
