'दुष्काळी दौरे काजू, बदाम खाण्यासाठी आहेत का?' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यावर जोरदार टीका केली. दुष्काळी दौरे केवळ काजू-बदाम खाण्यासाठी चालले आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुष्काळी दौरे काजू, बदाम खाण्यासाठी आहेत का?

point

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

Uddhav Thackeray : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यावर अत्यंत खरमरीत शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्राण आज कंठाशी आले असून त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, परिस्थिती इतकी बिकट आहे की दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांतील मुलांची लग्नं जुळणेही कठीण झाले आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर परिस्थितीत सरकार नक्की कसली कॅबिनेट मीटिंग घेत आहे आणि हे दुष्काळी दौरे केवळ काजू-बदाम खाण्यासाठी चालले आहेत का, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

दुष्काळी दौरे काजू, बदाम खाण्यासाठी आहेत का?

शासकीय दौऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या या कारभारावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, 'दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत फिरणारे मंत्री, अधिकारी आणि सहकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या या दुःखाशी आणि वेदनांशी खरोखरच काही देणेघेणे आहे की नाही, असा प्रश्न पडतो. दुष्काळी दौऱ्यांचे वास्तव मांडताना त्यांनी काही बातम्यांचा हवाला दिला. अनेक ठिकाणी हे दौरे अवघ्या दहा मिनिटांत उरकण्यात आले असून, तिथे जाऊन केवळ भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याच गाठीभेटी घेण्यात आल्याचे समोर आले आहे.' हे सर्व देखावे सरकार नक्की कोणासाठी आणि कशासाठी करत आहे, असा थेट सवाल करत ठाकरेंनी या दौऱ्यावर ताशेरे ओढले. तसेच हे दौरे काजू, बदाम खाण्यासाठी आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : मुख्याध्यापक गालाला चुकीचा स्पर्श करायचा, विद्यार्थीनींच्या वॉशरुममध्ये डोकावून पाहायचा..पुढे काय घडलं?

सुपर एल निनोच्या धोक्याबद्दल काय म्हणाले?

भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक संकटांची जाणीव करून देताना उद्धव ठाकरेंनी एका महत्त्वपूर्ण जागतिक अहवालाचा दाखला दिला. ते म्हणाले की, ''सुपर एलनिनो'च्या संभाव्य धोक्यामुळे भारतात सुमारे सोळा हजार मृत्यू होण्याचा गंभीर इशारा या अहवालात देण्यात आला आहे. या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने सर्वपक्षीय घटकांना आणि जनतेला सोबत घेऊन सर्वसमावेशक तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, या महाभयंकर संकटाला तोंड देण्यासाठी सरकारकडे काय योजना आहेत, याबाबत सत्ताधारी कोणालाही काहीही सांगायला तयार नाहीत, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे आहे.'

हे ही वाचा : 'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' ज्ञानेश कुमारांचा दाखला देत राज ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

दिखाऊपणात व्यस्त

एकंदरीत, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि आगामी नैसर्गिक धोक्यांचे आव्हान असताना सरकार मात्र केवळ दिखाऊपणात व्यस्त असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.