फार्महाऊसवर क्रूरतेचा कळस! पोलिसांसह सीआरपीएफ जवानाकडून 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई तक

एका 23 वर्षीय तरुणीवर उत्तरप्रदेशातील एका फार्म हाऊसवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी CRPF चा जवान, एक PSI आणि हेड कॉन्स्टेबलला ताब्यात घेण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

फार्महाऊसवर क्रूरतेचा कळस!

point

पोलिसांसह सीआरपीएफ जवानाकडून 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Crime News : एका फार्महाऊसवर 23 वर्षीय युवतीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) एक निरीक्षक,  हेड कॉन्स्टेबल तसेच एक पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून रिमांडची प्रक्रिया सुरू केली असून, ही घटना 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.

पूर्वीची ओळख अन् फार्महाऊसवर अत्याचार

प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला आरोपी सीआरपीएफ जवान मोहित उर्फ विक्की आणि निरीक्षक लालाराम यादव यांना पूर्वीपासून ओळखत होती. 22 सप्टेंबर रोजी ती या दोघांसोबत अमरोहा येथे पोहोचली होती. तिथे मोहितची भेट हसनपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक संजय तोमर याच्याशी झाली. त्यानंतर हे सर्वजण झुलपुरी येथील एका फार्महाऊसवर गेले, जिथे मुक्कामासाठी दोन खोल्या भाड्याने घेण्यात आल्या होत्या. काही वेळानंतर हेड कॉन्स्टेबल प्रमोद जेवण घेऊन तेथे पोहोचला आणि त्याच वेळी युवतीवर जबरदस्ती करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हे ही वाचा : 'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' ज्ञानेश कुमारांचा दाखला देत राज ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

कोण आहेत आरोपी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली. पीडितेच्या लेखी तक्रारीवरून हसनपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सीआरपीएफचा हेड कॉन्स्टेबल मोहित (रा. मुझफ्फरनगर), निरीक्षक लालाराम यादव (रा. अलवर, राजस्थान), उपनिरीक्षक संजय तोमर (रा. बागपत) आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद (रा. मुझफ्फरनगर) यांचा समावेश आहे. मोहितची नियुक्ती दिल्लीतील सीआरपीएफच्या 5 व्या बटालियनमध्ये, तर लालाराम यादव यांची नियुक्ती आसाममधील न्यू बोगाईगाव येथे 156 व्या बटालियनमध्ये आहे.

हे ही वाचा : बीडचा मित्र, चॅट GPT ची मदत आणि मशरूमचा किस्सा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे

धार्मिक पर्यटनाच्या बहाण्याने...

पोलीस अधीक्षक लखन सिंह यादव यांनी सांगितले की, पीडितेला धार्मिक स्थळाचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मुझफ्फरनगरहून आणण्यात आले होते आणि वाटेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात फार्महाऊसवर प्रत्यक्ष काय घडले आणि प्रत्येक आरोपीची यात काय भूमिका होती, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि पीडितेच्या जबाबानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.