शेजाऱ्यावर संशय, शरीरावर जखमांच्या खुणा; 18 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ, काय घडलं?

मुंबई तक

तेलंगणातील एका नर्सिंगच्या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तिची आई मोलमजुरी करुन तिला शिक्षण देत होती. मात्र मुलीच्या मृत्यूने या माऊलीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेजाऱ्यावर संशय, शरीरावर जखमांच्या खुणा

point

18 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ, काय घडलं?

Crime News : एक धक्कादायक आणि काळीज पिळटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका खासगी महाविद्यालयात परिचारिका (नर्सिंग) शाखेचे शिक्षण घेणारी 18 वर्षीय विद्यार्थिनी हरिणी हिचा मृतदेह तिच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूला अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. कॉलेजच्या सुट्ट्या घालवण्यासाठी हरिणी आपल्या मूळ गावी आली होती. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यातील ही घटना आहे.

शेजाऱ्यावर संशय

मिळालेल्या माहितीनुसार, हरिणीची आई राजेश्वरी गावातीलच एका नातेवाईकाच्या घरी गेली होती. त्या घरात परतल्या तेव्हा त्यांना मुलगी कुठेही दिसली नाही. त्यांनी तात्काळ तिचा शोध सुरू केला असता, घरातील बाथरुमच्या मागच्या बाजूला हरिणी मृतावस्थेत पडलेली आढळली. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापतींच्या आणि जखमांच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत होत्या. या जखमांमुळे तिच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत. हरिणीच्या आईने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : बीडचा मित्र, चॅट GPT ची मदत आणि मशरूमचा किस्सा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे

मोलमजुरी करुन शिक्षण

काही वर्षांपूर्वी हरिणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने मोलमजुरी करून अत्यंत कष्टाने आपल्या दोन्ही मुलींचे पालनपोषण केले आणि त्यांना शिक्षण दिले. या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत हरिणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुराव्यांचे संकलन करण्यासाठी न्यायवैद्यक आणि 'क्ल्यूज' (Clues) पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा : भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांवरील बलात्काराच्या आरोपांनी चित्रा वाघही हादरल्या! म्हणाल्या...

पोलिसांनी काय सांगितले?

कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या या घटनेत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा सहभाग निश्चित झालेला नसून मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी आणि सर्व शक्यतांचा विचार करून सखोल तपास करत आहेत.