आईने गांजासाठी 60 रुपये दिले नाहीत, 28 वर्षीय मुलाने केलं भयानक कांड

मुंबई तक

पोटच्या मुलाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना असून मुलाला गांजाचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईने गांजाला 60 रुपये दिले नाहीत

point

मुलाने केलं भयानक कांड

Crime News : गांजा खरेदी करण्यासाठी अवघे 60 रुपये न दिल्याने एका 28 वर्षीय मुलाने स्वतःच्या 51 वर्षीय आईची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहन यादव असे आरोपीचे नाव असून, त्याने आई मूला देवी यांच्या मानेवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले. हत्येनंतर आरोपी मुलगा सुमारे दोन तास आईच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील ही घटना आहे.

पैशांसाठी आईला द्यायचा त्रास

ही घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नव्हते. गांजाचे भीषण व्यसन असलेला मोहन पैशांसाठी रोज आईला त्रास देत असे. घटनेच्या दिवशीही त्याने आईकडे 60 रुपयांची मागणी केली. मूला देवी यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवताच संतापलेल्या मोहनने रागाच्या भरात घरातील कुऱ्हाड उचलली आणि आईच्या मानेवर पाचपेक्षा जास्त वेळा वार केले. या भीषण हल्ल्यात मूला देवी यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : ज्ञानेश कुमारांनी मोक्कार खेळ केला...(?!)

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला बघून...

या हत्याकांडाची माहिती मोहनचे काका रामेश्वर घरात आल्यावर समोर आली. त्याच वेळी मूला देवी यांचा मोठा मुलगा सोहन यादव पत्नीच्या बाळंतपणासाठी नोएडाहून घरी पोहोचला होता. घरात पाऊल ठेवताच आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून सोहनने हंबरडा फोडला. त्याचा आक्रोश ऐकून शेजारी आणि ग्रामस्थ गोळा झाले अन् त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा : भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांवरील बलात्काराच्या आरोपांनी चित्रा वाघही हादरल्या! म्हणाल्या...

आरोपीने काय सांगितलं?

माहिती मिळताच पोलीस अधिकारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी मोहन यादव याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.