बलात्कार प्रकरणात गावच्या पंचायतीची 'सेटलमेंट', पीडित मुलीचा आरोपीसोबत विवाहाचा निर्णय
UP panchayat settles minor rape case fixes marriage with accused : अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या तक्रारीनंतर गावच्या पंचायतीने कथितरित्या तडजोड घडवून आणत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर आरोपीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बलात्कार प्रकरणात गावच्या पंचायतीची 'सेटलमेंट'
पीडित मुलीचा आरोपीसोबत विवाहाचा निर्णय
UP panchayat settles minor rape case fixes marriage with accused : : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या तक्रारीनंतर गावच्या पंचायतने कथितरित्या प्रकरण तडजोडीत मिटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पंचायत बोलावण्यात आली. यामध्ये मुलीच्या कुटुंबीयांवर आणि अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांवर तडजोडीसाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिचा विवाह आरोपी मुलासोबत करण्याचा निर्णय पंचायतमध्ये घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या सुरुवातीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा : शेजाऱ्यावर संशय, शरीरावर जखमांच्या खुणा; 18 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ, काय घडलं?
आरोपीने जवळपास वर्षभर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वी आरोपी मुलाने धमकी देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप केला होता. हे फोटो सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपीने जवळपास वर्षभर तिचे लैंगिक शोषण केल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. मुलगी घाबरलेली असल्याने कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने कुटुंबीयांना कथित अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाऊन याबाबत विचारणा केली. तिथेही त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी शीशगढ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
हेही वाचा : भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांवरील बलात्काराच्या आरोपांनी चित्रा वाघही हादरल्या! म्हणाल्या...
