शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, फोटो व्हायरल
Sharad Pawar Meet Narendra Modi : दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी शरद पवार गेले होते. त्यानंतर आता शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत, त्यांचे फोटो समोर आलेले आहेत. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत. या घटनेला पीटीआयने दुजोरा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला
घटनेला पीटीआयने दुजोरा दिला
Sharad Pawar Meet Narendra Modi : दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी शरद पवार गेले होते. त्यानंतर आता शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत, त्यांचे फोटो समोर आलेले आहेत. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत. या घटनेला पीटीआयने दुजोरा दिला आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्रीच घेतली वांगचुक यांची भेट, नेमकं काय घडलं?
ट्विटवर हँडलवर भेटीचे फोटो
पीएमओ इंडिया या ट्विटवर हँडलवर भेटीचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सुप्रिया सुळे दिसत आहेत. मोदी आणि पवार एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. पवारांच्या हातात एक फाईल दिसत आहे. त्याच फाईलीतील एक कागद मोदींना दिल्याचं दिसून येतंय. आंदोलनाबाबतचं निवेदन असल्याचं सांगितलं जातंय. मोदी निवेदन वाचताना दिसत आहेत. मात्र, याबाबतची एकूण माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झालं आहे. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. जंतरमंतरवर देशातील विरोधी पक्षनेत्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलकांना धीर देण्याचा देखील प्रयत्न केला होता. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.
हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप; IMD चा अंदाज
राहुल गांधींसह काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पोलीस ठाणे गाठून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सोडवून आणले. या सर्व घटनेनंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.