Maharashtra Weather : मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप; IMD चा अंदाज

मुंबई तक

maharashtra weather : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज पावसाचा अलर्ट वर्तवलेला आहे. काही भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशातच जाणून घेऊयात 22 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आलेला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात वातावरण फिरल्याचं दिसून येतय

point

महाराष्ट्रात काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात वातावरण फिरल्याचं दिसून येत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज पावसाचा अलर्ट वर्तवलेला आहे. काही भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशातच जाणून घेऊयात 22 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आलेला आहे. 

हे ही वाचा : राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, नाकही फुटलं.. मोदींच्या घराबाहेर काय-काय घडलं?

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. तर मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि आहिल्यानगरात मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यांच मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिकच्या घटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. पुण्यातील घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आलाय. तसेच कोल्हापूर घाटमाथा परिसर आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

हे वाचलं का?