राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, नाकही फुटलं.. मोदींच्या घराबाहेर काय-काय घडलं?
Rahul Gandhi Protest : विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे काही खासदार यांनी आंदोलन सुरू केलं. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं, मात्र आता पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. आंदोलनादरम्यान झटापटीत नाकातून रक्त वाहताना दिसत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासाबाहेर राहुल गांधींचं आंदोलन
राहुल गांधींना ताब्यात घेतलं
Rahul Gandhi Protest : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आता विरोधकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वांना या आंदोलनात येण्याचे आश्वासन केलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून राहुल गांधीसह अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह इतर काही खासदारांची देखील उचल बांगडी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या झटापटीत राहुल गांधींचं नाक फुटलं.
हे ही वाचा : पीएम मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचा ठिय्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
राहुल गांधी याचं जसंच्या तसं ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्याव असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी ट्विट करत माहिती दिली. "विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला आहे. पंतप्रधान मोदींना वाटते की ते कोणतीही उत्तरे न देता, कोणत्याही परिणामांना सामोरे न जाता सुटू शकतात. पण ते तसे करू शकणार नाहीत, या वेळी तर अजिबातच नाही. आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे असे मानणाऱ्या प्रत्येक देशभक्त भारतीयांना मी आवाहन करतो - पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरच्या आमच्या धरणात सामील व्हा. भारतातील विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ":
"विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला आहे. पंतप्रधान मोदींना वाटते की ते कोणत्याही उत्तरांशिवाय, कोणत्याही परिणामांना सामोरे न जाता सुटू शकतात. ते तसे करू शकत नाहीत. या वेळी तर नाहीच. आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा असे मानणाऱ्या प्रत्येक देशभक्त भारतीयाला मी आवाहन करतो - पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरच्या आमच्या धरणात सामील व्हा. भारतातील विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही," असं ट्विट करत राहुल गांधींनी सरकारला धारेवर धरलं.










