खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर, मुंबई-नाशिक महामार्गावर तब्बल 15 किमी ट्रॅफिक जाम!

मिथिलेश गुप्ता

भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावर सुमारे 15 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाल्याने हजारो प्रवासी अडकले असून रुग्णवाहिकांनाही या महाजामचा फटका बसला आहे. गणपती विसर्जनानंतर वाढलेली वाहनांची संख्या आणि वाहतूक नियोजनाचा प्रश्न यामुळे ठाणे ते राजनोली नाका परिसरात वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

bhiwandi mumbai nashik highway 15 km traffic jam ambulances stuck mp balya mama constituency traffic issue
मुंबई-नाशिक हायवेवर भीषण ट्रॅफिक
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर 15 किलोमीटरचा महाजाम

point

प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह !

point

15 किलोमीटरच्या कोंडीने भिवंडीकर हैराण, रुग्णवाहिकांनाही रस्ता मिळेना

भिवंडी: भिवंडीचे खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर पाहायला मिळाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. ठाणे ते भिवंडी बायपासमधील राजनोली नाका परिसरापर्यंत सुमारे 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून हजारो प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. विशेष म्हणजे रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले.

शनिवारी सकाळपासून मुंबई-नाशिक महामार्ग हा मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नाशिकला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची वर्दळ असते. त्यात गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या कार, बस, टॅक्सी आणि इतर वाहनांची भर पडल्याने वाहतूक अक्षरशः ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली. ठाण्यापासून भिवंडी बायपास आणि पुढे राजनोली नाक्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होती, तर काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र होते.

रुग्णवाहिकाही कोंडीत!

या वाहतूक कोंडीचा सर्वात गंभीर परिणाम आपत्कालीन सेवांवर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. विमानाची वेळ गाठण्यासाठी घरातून लवकर निघालेल्या प्रवाशांना महामार्गावरील लांबच लांब रांगांमध्ये अडकून राहावे लागले.