अंमली प्रकरणात शिक्षिका, पतीने पत्नीवर चाकूने केला हल्ला

मुंबई तक

Crime News : अंमली पदार्थांच्या प्रकरणात शिक्षिकेचा हात असल्याची धक्कादायक घटना आहे, या घटनेत संतापलेल्या पतीने पत्नीवर हल्ला केला.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कंत्राटी शिक्षिकेला अंमली पदार्थाच्या व्यापारात अटक 

point

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Crime News : केरळच्या कोझिकोड येथील वडकरा पोलीस ठाण्यात एमडीएमए प्रकरणातील महिलेवर तिच्याच पतीने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना आहे. एमडीएमए प्रकरणातील आरोपी असलेल्या एका शिक्षिकेवर सकाळी कोझिकोडमधील वडकरा पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात जखमी महिलेची किर्तना अशी ओळख आहे. एमडीएमए प्रकरणात जमिनींच्या अटींवर सही करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती, तेव्हा सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

हे ही वाचा : शेत, नवरा-बायको आणि दारू... 32 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने वार करत हत्या

कंत्राटी शिक्षिकेला अंमली पदार्थाच्या व्यापारात अटक 

किर्तना पेराम्ब्रा येथील रिसोर्स सेंटरमध्ये एक विशेषज्ञ कंत्राटी शिक्षिका होत्या. अंमली पदार्थांच्या व्यापारात सामील असलेल्या व्यक्तींमध्ये दुवा म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली त्यांना एमडीएमए प्रकरणात अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना बीआरसीमधील त्यांच्या शिक्षिकेच्या पदावरून काढून टाकण्यात आले होते. 

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

याआधी इंदूरमध्ये नुकतेच एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला. एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली होती. संबंधित महिलेची इमुनलय जॉय अशी ओळख समोर आली. व्यावसायिक व्हिसावरून नायजेरियन भारतात आली होती. मुंबई ते इंदूरपर्यंत पसरलेल्या ड्रग्ज नेटवर्कच्या संबंधित पोलिसांचे पथक तपास करत आहेत. 

हे ही वाचा : भिवंडी : 'माझ्या मुलाला फाशी द्या', लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीच्या आईची मागणी

पोलविसांनी झडती घेतली असता, महिलेच्या बॅगेतील पाऊचमधून 57.18 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या कोकेनचे मूल्य हे अंदाजे 29 लाख असल्याचा अंदाज वर्तवविला आहे. दरम्यान, आरोपी इमुनल जॉय ही नायजेरियातील लागोस येथील रहिवासी असल्याची माहिती मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात राहत असल्याची माहिती आहे.