मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेवर बांधले जाणार चार नवे प्लॅटफॉर्म्स, काय आहे प्लॅन?

मुंबई तक

मुंबईतील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विरारपर्यंत अधिक लोकल फेऱ्या सुरू करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेवर लवकरच चार नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पश्चिम रेल्वेवर बांधले जाणार चार नवे प्लॅटफॉर्म्स

point

काय आहे प्लॅन?

Mumbai News : मुंबईतील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणि विरारपर्यंत अधिक लोकल फेऱ्या सुरू करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेवर लवकरच चार नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत. या प्रकल्पानुसार, बोरीवलीत दोन, तर अंधेरी आणि विरारमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत मिळेल.

'इथे' उभारले जातील नवे प्लॅटफॉर्म्स

बोरीवलीमध्ये बांधण्यात येणाऱ्या दोन प्लॅटफॉर्मपैकी एक प्लॅटफॉर्म बोरीवली आणि विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा (लाईन) भाग म्हणून उभारला जाईल, तर दुसरा प्लॅटफॉर्म दक्षिण बाजूस हार्बर लाईनच्या विस्ताराचा भाग म्हणून बांधला जाईल. हे दोन्ही प्लॅटफॉर्म सुमारे 330 मीटर लांब आणि सात मीटर रुंद असतील. याशिवाय, विरार स्थानकातही पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म नव्याने तयार केला जाणार आहे.

हे ही वाचा : भिवंडी : 'माझ्या मुलाला फाशी द्या', लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीच्या आईची मागणी

नवीन लोकल सेवा सुरु करणे शक्य

या अतिरिक्त पायाभूत सुविधांमुळे रेल्वेच्या कामकाजात लवचिकता येईल आणि विरारपर्यंत सुमारे 30 ते 40 नवीन लोकल सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. नव्याने विकसित होणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगळी होईल. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या नवीन प्लॅटफॉर्म आणि मार्गिकांमुळे उपनगरीय सेवा वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर विरारपर्यंत वाढीव लोकल सेवांचे नियोजन करता येईल.

हे ही वाचा : बीड: गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर चाकूने हल्ला, परिसर हादरला

अंधेरी स्थानकावरील स्थिती

दुसरीकडे, अंधेरी स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यांत विस्ताराची योजना आखली आहे. अंधेरी स्थानकातून दररोज सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात आणि एक हजारहून अधिक उपनगरीय गाड्यांची ये-जा असते. त्यामुळे येथील प्रवाशांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि कोंडी सोडवण्यासाठी या नव्या आराखड्याची मोठी मदत होणार आहे.