उमरखेड हादरले! वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, दोघांचा करुण अंत
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात बैलबाजार भरणाऱ्या मैदानासमोर ब्लास्टिंग ट्रॅक्टरचे वेल्डिंग सुरु असताना सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वेल्डिंगचे काम सुरू असताना सिलेंडरचा स्फोट अन् दोघांचा मृत्यू
सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली होती का?
Yavatmal News : भास्कर मेहपरे - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात बैलबाजार भरणाऱ्या मैदानासमोर ब्लास्टिंग ट्रॅक्टरचे वेल्डिंग सुरु असताना सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. याच पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : भिवंडी : 'माझ्या मुलाला फाशी द्या', लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीच्या आईची मागणी
वेल्डिंगचे काम सुरू असताना सिलेंडरचा स्फोट अन् दोघांचा मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, बैलबाजाराच्या मैदानासमोर ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. जखमींना तात्काळपणे स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले. या घटनेची माहिती मिळताच, उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली होती का?
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, दुर्घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला होता. वेल्डिंग सुरू असताना नेमका स्फोट कशामुळे झाला? इतर संबंधित ट्रॅक्टर आणि सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक असणारी खबरदारी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.
हे ही वाचा : बीड: गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर चाकूने हल्ला, परिसर हादरला
या भीषण दुर्घटनेमुळे उमरखेड परिसर हादरून गेला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या तपासानंतर स्फोटाचे नेमके कारण आणि दुर्घटनेची सविस्तर माहिती समोर येणार आहे.
