ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरुद्ध थोपटले दंड! मुंबईत काढणार जनमोर्चा
निवडणूक आयोगातील मतभेद आणि 'एसआयआर'विरोधात ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुंबईत महामोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरुद्ध थोपटले दंड!
मुंबईत काढणार जनमोर्चा
Raj Thackeray : निवडणूक आयोगातील मतभेद आणि 'एसआयआर'विरोधात ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. निवडणूक आयोगातील आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे 'इंडियन एक्सप्रेस'मधील एका वृत्तातून नुकतेच समोर आले होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा 'सीजेपी'ने दिला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुंबईत महामोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकी काय भूमिका मांडली आहे, जाणून घेऊया.
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.
हे ही वाचा : उमरखेड हादरले! वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, दोघांचा करुण अंत
अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा.
