आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत

मुंबई तक

dharashiv drought : धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा चिमुकल्याने आदित्य ठाकरेंसमोर मांडली. वडिलांच्या जीवाची भीती असल्याने हा मुलगा सतत त्यांच्यासोबत राहत असल्याचे त्याने सांगितले.

ADVERTISEMENT

dharashiv drought
dharashiv drought
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना

point

आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत

dharashiv drought : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी कुटुंबाची दुष्काळामुळे बिकट परिस्थिती झाली आहे. वडील आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नयेत, या भीतीने चिमुकला रात्रंदिवस त्यांच्यासोबत राहत असल्याची व्यथा त्याने आदित्य ठाकरेंसमोर मांडली. धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील एका शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी एका चिमुकल्याने आणि त्याच्या वडिलांनी आपली व्यथा मांडली. या कुटुंबाकडे 10 एकर शेती आहे. मात्र दुष्काळामुळे शेतात उत्पन्न आलेले नाही. शेतीमध्ये घरातील उपलब्ध पैसे खर्च झाले असून आता घरात अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू आणण्यासाठीही पैसे नसल्याचे वडिलांनी सांगितले. मुलाच्या शिक्षणाची फी भरण्यासाठीही पैसे नसल्याची परिस्थिती आहे. या कुटुंबाला पीक विम्याचीही मदत मिळालेली नाही.

हेही वाचा : खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर, मुंबई-नाशिक महामार्गावर तब्बल 15 किमी ट्रॅफिक जाम!

चिमुकल्याला आपल्या वडिलांच्या जीवाची चिंता 

या परिस्थितीत सर्वात मोठी चिंता या चिमुकल्याला आपल्या वडिलांच्या जीवाची आहे. वडील आत्महत्या करण्याबाबत बोलत असल्याने मुलगा सतत त्यांच्या मागे फिरत असल्याचे त्याने सांगितले. यापूर्वी आईजवळ झोपणारा हा मुलगा गेल्या दीड ते अडीच महिन्यांपासून वडिलांजवळ झोपत आहे. वडील घराबाहेर पडले की तोही त्यांच्या मागे जातो. वडील शेताकडे निघाले की, शाळेत जाण्याऐवजी त्यांच्यासोबत शेतात येतो. शेतात काम नसतानाही वडिलांना एकटे सोडण्याची त्याची तयारी नसते. वडिलांनी आपल्याला सोडून कुठे जाऊ नये आणि ते सुरक्षित राहावेत, यासाठी तो सतत त्यांच्यासोबत राहत असल्याचे त्याने सांगितले. घरात खाण्यासाठी राशन नसल्याचेही त्याने सांगितले.

हेही वाचा : ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरुद्ध थोपटले दंड! मुंबईत काढणार जनमोर्चा