दिल्लीच्या आंदोलनात मनोज जरांगे, अभिजीत दिपकेशी काय चर्चा?
Manoj Jarange Patil On Jantarmantar : दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेतील घोळ आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या निषेधार्थ मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. अशातच जंतरमंतरवर विरोधकांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे देखील तिथे उपस्थित होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जंतरमंतरवरून मनोज जरांगे आक्रमक
'आपणच निवडून दिलेल्या लोकांना मजा आला'
Manoj Jarange Patil On Jantarmantar : दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेतील घोळ आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या निषेधार्थ मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. अशातच जंतरमंतरवर विरोधकांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे देखील तिथे उपस्थित होते.
हे ही वाचा : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, फोटो व्हायरल
जंतरमंतरवरून मनोज जरांगे आक्रमक
जरांगेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "दिल्लीत गोरगरीब विद्यार्थ्यांवर असा अन्याय होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे, राजधानीत गोरगरीबांची लेकरं न्याय मागण्यासाठी येतात. त्यांच्या न्यायासाठी सोनम हे आंदोलन करत आहेत, तसेच दुसरीकडे दिपके देखील आहेत. आपण त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर असा क्रूरपणे हल्ला केला असेल, तर आपण मदतीला का जाऊ नये," असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं मत मांडलं
'आपणच निवडून दिलेल्या लोकांना मजा आला'
"आपणच निवडून दिलेल्या लोकांना माजा आला, त्याची त्यांना किंमत नसेल तर त्यांना जाणीव करून द्यावी लागते. त्यांना आम्ही गावात हिंडू देखील देणार नाहीत. इथून पुढच्या काळात आंदोलन झालं तर देशभरात भाजपच्या मंत्र्यांना फिरता येणार नाही," असं जरांगे म्हणाले.
हे ही वाचा : मोठी बातमी : जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्रीच घेतली वांगचुक यांची भेट, नेमकं काय घडलं?
पुढं ते म्हणाले की, "मी आंदोलनाच्या संदर्भात चर्चा केली. विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी शांत राहावं, आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडल्याचा प्रयत्न केला जाईल. सोनमजी यांची काळजी घ्या. इथं जी लेकरं बसली आहेत, त्यांची ती एक तळमळ आहे. आपल्या एका निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेनं आंदोलन केलं तर न्याय मिळतो", असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.










