तुम्हाला माहितीए 'या' 3 आंदोलनांनी अवघ्या भारताचं राजकारणचं कसं बदललं?
स्वातंत्र्यानंतर भारतात झालेल्या काही विद्यार्थी आंदोलनांनी केवळ शिक्षण क्षेत्रापुरताच प्रभाव टाकला नाही, तर देशाच्या राजकारणालाही नवे वळण दिले. जाणून घ्या त्या तीन आंदोलनांचा इतिहास, त्यामागील कारणे आणि त्यांचे राजकीय परिणाम.
ADVERTISEMENT

स्याही से नहीं... कभी-कभी सड़कों पर निकले कदमों से भी इतिहास लिखा जाता है,
और जब नौजवान जागते हैं... तो सत्ता नहीं, पूरा दौर बदल जाता है...
देशात आज पुन्हा एकदा विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरलेयत. दिल्लीच्या रस्त्यांवर घोषणाबाजी सुरूय. सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पण हा भारतासाठी पहिलाच प्रसंग नाही. कारण स्वातंत्र्यानंतर तीन विद्यार्थी आंदोलनं झाली की ज्यानं राजकारणच नाही तर अवघ्या देशालाच ढवळून काढलं... एका आंदोलनामुळे देशात आणीबाणी लागू झाली. दुसऱ्या आंदोलनामुळे संपूर्ण जातीचं राजकारण बदललं. आणि तिसऱ्या आंदोलनाने भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी लाट निर्माण केली. या तीनही आंदोलनांमधील एक बाब अशी की ही तीनही आंदोलनं Gen Z नसताना झालेली. ज्यांचा परिणाम आजही भारतीय राजकारणावर दिसतोय.
आंदोलन क्रमांक 1 - नवनिर्माण आंदोलन

1973 च्या अखेरीस गुजरातमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात जेवणाचे दर वाढले. सुरुवातीला हा प्रश्न फक्त मेस फीचा होता. पण काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा संताप संपूर्ण गुजरातभर पसरला.










