सोन्याचे दागिने घालून बनवली रील, पुढं महिलेसोबत काय घडलं बघा...

मुंबई तक

एका महिलेने सोन्याचे दागिने घालून रील बनवली होती. ती रील पाहून काही चोरांनी तिच्या घराची रेकी केली आणि दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना नेमकी कुठे घडलीये आणि ती रील बनवणारी महिला कोण आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Google CTA

Social Media Show Off Theft Case : सध्या सोशल मीडियावर लक्झरी लाइफस्टाइल, महागडे दागिने आणि गाड्यांचे प्रदर्शन करणे खूप सामान्य झाले आहे. मात्र हाच दिखावा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील एका महिलेसाठी अत्यंत महाग ठरला. मोहनी गावात राहणाऱ्या एका महिलेने तिच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो पाहून चोरट्यांनी थेट तिच्या घराची रेकी केली आणि संधी मिळताच घरावर डल्ला मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सोशल मीडियावर आपल्या मौल्यवान वस्तू किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे काय धोके असू शकतात? आणि अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि सतर्क राहा!

हे वाचलं का?