काळजाचा थरकाप उडवणारी घटना, सांगलीत 13 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात झाडली गोळी!

मुंबई तक

सांगलीमध्ये 13 वर्षीय वेदांत बंडगर या अल्पवयीन मुलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण

ADVERTISEMENT

in sangli 4 to 5 men opened fire on a 13 year old boy grandson of a porter union leader was shot dead
सांगलीत 13 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या
google news

सांगली: सांगली शहरातील अभयनगर परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि हमाल पंचायत पतपेढीचे सभापती बाळासाहेब बंडगर यांचा 13 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

13 वर्षीय वेदांतच्या डोळ्यातच घुसली गोळी

प्राथमिक माहितीनुसार, वेदांत बंडगर हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा होता. अभयनगर येथील राहत्या घरी असताना 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घरावर धाड टाकली. त्यानंतर त्यांनी वेदांतवर गोळीबार केला. या गोळीबारातील एक गोळी वेदांतच्या उजव्या डोळ्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अल्पवयीन मुलावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरात घुसून करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे वाचलं का?