अभिजीत दीपके यांना मारहाण करणारा राकेश गुर्जर कोण?

मुंबई तक

कॉक्रोच जनता पार्टीचं राजस्थानमधील जयपूर येथे आंदोलन झालं. यावेळी अभिजित दिपकेनं तरुणांना मार्गदर्शन केलं. तरुणांनी त्याला खांद्यावर घेतलं असताना काही लोकांनी त्याला मारहाण केली. ज्यात राकेश गुर्जर हा मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले. राजेश गुर्जरने अभिजीत दीपकेला मारहाण केलेल्या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

google news

कॉक्रोच जनता पार्टीचं राजस्थानमधील जयपूर येथे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अभिजित दिपकेनं तरुणांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर तरुणांनी त्याला खांद्यावर घेतलं असताना काही लोकांनी त्याला मारहाण केली. ज्यात राकेश गुर्जर हा मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले. राकेश गुर्जरबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेली आहे. संबंधित मारहाण करणारा राजेश गुर्जर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील असल्याची माहिती आहे. 

अभिजीत दीपकेवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेरोजगारी आणि वाढत्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार या मुद्यावरून त्याने पत्रकार परिषद घेतली. या आंदोलनामागील सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असल्याचं तो म्हणाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवत राकेश गुर्जर आणि इतरांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अशातच अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये मारहाण करण्यात आल्यानंतर सुरक्षा देण्यात आली. या घटनेनं जयपूरमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आली. यामुळे आता जयपूरमधील स्थानिक लोक आणि सामज माध्यमांवरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

हे वाचलं का?