एक तरुणी...दोन प्रियकर, अन् मर्डरनेच झाला शेवट; कोणी कोणाला संपवलं?

मुंबई तक

Crime News : गौतम मौर्य हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून प्रेमसंबंध आणि वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचा दावा केला आहे. युवतीच्या भावालाही कथित कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

एक तरुणी...दोन प्रियकर

point

अन् मर्डरनेच झाला शेवट; कोणी कोणाला संपवलं?

Crime News : चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात घडलेल्या गौतम मौर्य हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केल्याचा दावा केला आहे.  दिलावरपूर गावात 31 जुलै रोजी भरदिवसा गौतम मौर्य या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी अनेक तास चक्का जाम आंदोलन केले होते. हल्ल्यानंतर घटनास्थळीच मुख्य आरोपी समीर अली हा जमावाच्या ताब्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी समीर अलीसह त्याचे वडील आणि भाऊ अशा एकूण चार जणांना अटक केली होती.

हेही वाचा : 'क्या बोलती पब्लिक', नावाने देशव्यापी अभियान, कॉकरोज जनता पार्टीची पुढची दिशा ठरली

गौतम संबंधित युवतीला त्रास 

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी चौकशी, उपलब्ध पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रमाची सांगड घातली. त्यातून अश्वनी नावाच्या आणखी एका व्यक्तीची भूमिका समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्येमागे प्रेमसंबंध हे प्रमुख कारण होते. गौतम मौर्य आणि समीर अली या दोघांचेही एकाच युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गौतम संबंधित युवतीला त्रास देत होता, तिचे कथितपणे ब्लॅकमेलिंग करत होता आणि तिचा भाऊ अश्वनी यालाही धमकावत होता. ही संपूर्ण बाब संबंधित युवतीने तिच्या भावाला आणि समीर अलीला सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

हेही वाचा : मोलकरणीने निवृत्त कॅप्टनच्या पत्नीला संपवलं, नवरा अन् मुलाच्या मदतीने रचला कट