ठाकरेंचे 6 खासदार फुटले पण ट्रोलर्सने सोशल मीडियावर ओमराजेंचाच बाजार का उठवला? विषय लईच गंभीर!

मुंबई तक

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच धाराशिवचे शिवसेना UBT पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे कारण.

ADVERTISEMENT

six mps from uddhav thackeray shiv sena rebelled yet why is omraje nimbalkar one facing most trolling on social media
ओमराजे निंबाळकर (फाइल फोटो)
google news

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं निश्चित झालेलं असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आले आहेत. पक्षांतराच्या या घडामोडीनंतर अनेक शिवसैनिक आणि ठाकरे समर्थकांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर तीव्र टीका सुरू केली आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पोस्ट, मीम्स आणि प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

ट्रोलिंगचं मुख्य कारण काय?

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांची ओळख कट्टर शिवसैनिक म्हणून होती. त्यांनी अनेक सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे जर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तो "मतदारांचा विश्वासघात" असल्याचा आरोप ठाकरे समर्थकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लाटेत आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेच्या जोरावर विजय मिळवल्यानंतर आता पक्षांतर केल्यामुळे अनेक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

कोणत्या पद्धतीने सुरू आहे ट्रोलिंग?

1. "मतं ठाकरे यांच्या नावावर, खासदार शिंदेंसोबत"

हे वाचलं का?