खाकी वर्दीला बट्टा! तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

मुंबई तक

Crime News : जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेनं पोलिसाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. जमिनीच्या वादावरून पीडित महिला न्याय आणि मदतीच्या आशेने पोलिसांकडे गेली होती, मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मदतीचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार 

point

कोणाला सांगितल्यास हत्या करण्याची दिली धमकी 

Crime News : ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात पोलीस प्रशानाला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेनं पोलिसांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. संबंधित पोलीस हा ओडिशातील सारणकुल पोलीस ठाण्यातील असल्याचा आरोप आहे. पीडितेचं म्हणणं असं की, ती जमिन प्रकरणाच्या न्याय आणि मदतीच्या आशेने पोलिसांकडे गेली होती, मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. 

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलाने 9 वर्षीय मुलीला मंदिरामागे नेत नको तेच..

मदतीचे आमिष दाखवून पोलिसाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार 

महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, जमिनीच्या वादावर चर्चा झाली होती, अशातच सारणकुल पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ठाणेदार सुजित कुमार दास यांनी महिलेला मदतीचे आमिष दाखवून भाड्याच्या घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

कोणाला सांगितल्यास हत्या करण्याची दिली धमकी 

पीडितेनं असा आरोप केला की, घटनेनंतर आरोपी अधिकाऱ्याने जर तिने या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास मृत्यूंदंडासह गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. भीती आणि दबावाने काही काळ शांतच राहिली होती, नंतर या प्रकाराबाबत पीडितेनं घटनेबाबतची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

हे ही वाचा : गे डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् खोलीत 7 जण..

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे. आरोपी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुजित कुमार दास यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल फोन बंद लागला होता. त्यांनी पुन्हा कोणताही प्रतिसाद दिला नाही. 

हे वाचलं का?