13 वर्षीय मुलाने 9 वर्षीय मुलीला मंदिरामागे नेत नको तेच..

मुंबई तक

Crime News : एका गावातील 13 वर्षीय मुलाने इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई केली असता, विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मंदिराच्या मागे मुलीवर विनयभंग

point

पीडितेला रुग्णालयात दाखल केले

Crime News : उत्तराखंडच्या पुरोला ब्लॉकमधील एका गावातील 13 वर्षीय मुलाने इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थीनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई केली असता, विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. 

हे ही वाचा : गे डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् खोलीत 7 जण..

मंदिराच्या मागे मुलीवर विनयभंग

बुधवारी पीडितेची आई ही जवळच्या गावातील जत्रेत गेली होती. तिचे वडील शेतात काम करत होते. मुलगी आणि मुलगा गावातील मंदिरात खेळताना,  मुलानेच मुलीला मंदिराच्या मागील बाजूस नेलं आणि तिच्यावर विनयभंग केला. जेव्हा विद्यार्थिनीचे वडील कामावरून घरी परतले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात माखलेली आढळून आली होती. 

हे ही वाचा : सेप्टिक टँकमध्ये आढळला शितलचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

पीडितेला रुग्णालयात दाखल केले

चौकशी केल्यानंतर मुलीने तिच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडितेची अस्वस्थता पाहून तिला पुराळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ठाणेदार दीपक सिंह कथायत यांनी माहिती दिली की, दोघेही अल्पवयीन असून, वडिलांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. संबंधित मुलाची पुढील चौकशी सुरू आहे. 

हे वाचलं का?