गे डेटिंग अॅपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् खोलीत 7 जण..
Crime news : तरुणाने गे डेटिंग अॅप डाउनलोड केलं, नंतर काही तरुणांशी गप्पा देखील मारल्या आणि मैत्री करत भेटण्याचा प्लान केला. भेटण्याचा दिवस ठरला संबंधित तरुण नियोजित ठिकाणी गेला असता, एका खोलीत सात लोक त्याचे वाट बघत होते. त्या तरुणाला भलताच संशय आला. तरुण डेटवर नाही, तर एका भलत्याच जाळ्यात फसला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गे डेटिंग अॅपवरून तरुणाशी मैत्री
घटनास्थळी भेटायला वोलावले..
Crime news : एका तरुणाने गे डेटिंग अॅप डाउनलोड केलं, नंतर काही तरुणांशी गप्पा देखील मारल्या आणि मैत्री करत भेटण्याचा प्लान केला. भेटण्याचा दिवस ठरला संबंधित तरुण नियोजित ठिकाणी गेला असता, एका खोलीत सात लोक त्याचे वाट बघत होते. त्या तरुणाला भलताच संशय आला. तरुण डेटवर नाही, तर एका भलत्याच जाळ्यात फसला होता. काही मिनिटांतच त्याचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात अटक झालेल्यांची ओळख साहिल चौहान, शक्ती बाजीपारा, भार्गव परमार, समीर कोडिया, फरदीन शेख, समीर देवान आणि अंकित त्यागी अशी आहे.
हे ही वाचा : गुरुचे पुष्य नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींनी सावधगिरी बाळगावी
गे डेटिंग अॅपवरून तरुणाशी मैत्री
सुरेंद्रनगर जिल्ह्यात लख्तर तालुक्यातील तरुणाने एक गे डेटिंग अॅप डाऊनलोड केले, नंतर त्यावर काही लोकांशी गप्पा मारल्या. नंतर त्याच्याशी मैत्री देखील झाली आणि तरुणाला सुरेंद्रनगर येथे भेटण्यास बोलावले होते. समलैंगिक संबंधांच्या शोधात तरुण ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. भेटण्यास बोलवलेलं ठिकाण म्हणजे एक निर्जन खोली होती.
घटनास्थळी भेटायला वोलावले..
पोलिसांनी याबाबत सांगितलं की, तिथे आधीच सात जण घटनास्थळी उपस्थित होते. संबंधित तरुण घटनास्थळी पोहोचताच त्याला घेरण्यात आले होते. आरोपींनी त्याला मारहाण केली, धमकावले आणि त्याचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. नंतर तेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढंच नाही,तर 31 हजार रुपये रोख रक्कम उकळले. जर कोणाला काही सांगितल्यास त्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जातील अशी धमकी दिली.
हे ही वाचा : सेप्टिक टँकमध्ये आढळला शितलचा मृतदेह, नेमकं काय घडलं?
तरुणाने पोलीस ठाणे गाठून संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल केली असता, सुरेंद्रनगर शहर 'अ' विभाग पोलिसांना तात्काळपणे तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच तात्काळपणे संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. दरम्यान, पोलिसांना संशय आला की, ही टोळी बऱ्याच काळापासून सोशल मिडिया आणि डेटिंग अॅपचा वापर करून लोकांना लक्ष कर









