सेप्टिक टँकमध्ये आढळला शितलचा मृतदेह, नेमकं काय घडलं?
Crime News : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एका आई आणि मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून, मुलीने सेप्टिक टँकमध्ये जीव दिल्यानंतर आईनेही गळफास लावून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सेप्टिक टँकमध्ये आढळला शितलचा मृतदेह
नेमकं काय घडलं?
Crime News : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथे घडलेल्या एका अत्यंत भयावह आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बागकुआ टंकी परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय मधुबाला राठौर आणि त्यांची 30 वर्षीय मुलगी शीतल राठौर या मायलेकींनी एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. बुधवारी रात्री घराचे दार आतून बंद असल्याने आणि आतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. तिथे शीतलचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये तरंगताना दिसला, तर आई मधुबाला हिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती.
हेही वाचा : शिर्डी : 'गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..' वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले
वैवाहिक कलहामुळे शीतल नैराश्यात
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल राठौर हिचे लग्न चार वर्षांपूर्वी देवास जिल्ह्यातील नरवर झाला येथील कपिल राठौर याच्याशी झाले होते. मात्र, गेल्या एका वर्षापासून पती आणि सासरच्या मंडळींशी असलेले वाद विकोपाला गेल्यामुळे ती गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती. वैवाहिक कलहामुळे शीतल मानसिक तणावाखाली होती आणि याच नैराश्यातून तिने सेप्टिक टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आपल्या लाडक्या मुलीचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये पाहिल्यानंतर, आई मधुबाला यांना हा आघात सहन झाला नाही आणि त्यांनीही काही वेळातच फाशी घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा : Breaking News: 'ऑपरेशन टायगर'बाबत आताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, नेमकं काय अडलं?









