फोडाफोडीच्या राजकारणावरून शर्मिला ठाकरे आक्रमक, भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई तक

sharmila Thackeray on bjp : भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर आणि महागाईवर शर्मिला ठाकरे यांनी साधला निशाणा; चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून सरकारला विचारले जाब.

ADVERTISEMENT

google news

Sharmila Thackeray on BJP : शर्मिला ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, गेल्या 12 वर्षांतील कामकाजावर जोरदार टीका केली आहे. महागाईचा गगनाला भिडली असताना, सामान्य जनतेच्या समस्यांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलन करून सत्तेत आलेल्या भाजपला आज सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांची कोणतीही जाणीव उरलेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सत्तेचा वापर करून इतर पक्षांतील नेते फोडण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवा, असा सल्ला शर्मिला ठाकरे यांनी भाजपला दिला.

हेही वाचा : 20 तासांपूर्वीची पोस्ट पाहून विश्वास बसणार नाही, छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या

शर्मिला ठाकरे यांनी भाजपला सुनावले 

राजकीय फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत परखड शब्दांत भाजपला सुनावले आहे. दुसऱ्यांचे पक्ष किंवा नेते चोरण्याऐवजी स्वतःच्या कार्यकर्त्यांना घडवण्यावर भर द्यावा, असे सांगत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आरएसएसच्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे आवाहन करत, त्यांनी भाजपच्या या सत्तेच्या राजकारणाला लक्ष्य केले. राजकारणातील या प्रवृत्तीमुळे सामान्यांचे प्रश्न मागे पडत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे.

या भाषणादरम्यान त्यांनी विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कारभाराचा पर्दाफाश केला. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या बंद अवस्थेवर त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही जर विमानतळ कार्यन्वित नसेल, तर त्यामागे नक्की कोणाचा स्वार्थ आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. जनसामान्यांच्या करातून जमा झालेला पैसा अशा प्रकल्पांत अडकून पडला असून, प्रशासकीय अपयशामुळे हे विमानतळ धूळ खात पडल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 

हे वाचलं का?