अल निनोच्या संकटामुळे पावसाबाबतची अनिश्चितता, राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पुढे ढकलल्या

मुंबई तक

Maharashtra weather : राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. 14 जून 2026 तारीख समोर आली तरीही अद्याप मान्सूनचा राज्यात पत्ता नाही. याचमुळे आता राज्यातील बळीराजा हा कोंडीत सापडला आहे. अल निनोच्या या संकटामुळे पावसाबाबतची अनिश्चितता निर्माण झाली आणि पेरणी कधी करता येईल? असा प्रश्न उपस्थित होतोय.  

ADVERTISEMENT

Google CTA

Maharashtra Weather : राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. 14 जून 2026 तारीख समोर आली तरीही अद्याप मान्सूनचा राज्यात पत्ता नाही. याचमुळे आता राज्यातील बळीराजा हा कोंडीत सापडला आहे. अल निनोच्या या संकटामुळे पावसाबाबतची अनिश्चितता निर्माण झाली आणि पेरणी कधी करता येईल? असा प्रश्न उपस्थित होतोय.  

केरळ, तामिळनाडू आणि इतर दक्षिण भागांत काही प्रमाणात आगमन झाले असून राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी पावसाची सरसकट भरभराट झालेली नाही. याचा काहीअंशी प्रमाणात कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की, मान्सूनचा प्रभाव हा पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये दिसून येऊ शकतो. परंतु त्यासाठी हवामानातील परिस्थिती ही अनुकूल असणे गरजेचे आहे. पावसात होणाऱ्या चढउतारामुळे अनेक भागांत वेगवेगळा परिणाम दिसून येऊ शकतो, यामुळे सतर्कता आवश्यक आहे. 

राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण प्रदेशात उष्णतेशी एकत्र दमट हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा आणि दमट हवामानामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.