समीरने 20 वर्षीय गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार केला, गुप्तांगातून रक्तस्त्राव अन्...

मुंबई तक

crime news : एका निर्सिंग विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की, तिचे एका समीर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या प्रकरणात असेही समोर आले री, ती मुलगी गर्भवती होती आणि तिचा गर्भ लपवण्यासाठी समीरने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेला अत्याचार आणि रक्तस्त्रावाच्या धक्क्याने मृत्यू 

point

आरोपी समीर मोहम्मदवर लैंगिक अत्याचार आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Crime News : वाराणसीत एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे, जिथे एका निर्सिंग विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की, तिचे एका समीर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या प्रकरणात असेही समोर आले री, ती मुलगी गर्भवती होती आणि तिचा गर्भ लपवण्यासाठी समीरने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. गुप्तांगातून आलेल्या रक्तस्त्रावामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : Astrology : सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे नशीब बदलणार

पीडितेला अत्याचार आणि रक्तस्त्रावाच्या धक्क्याने मृत्यू 

नंतर मृतदेह शवविच्छेदनास नेण्यात आला होता, या सर्व अफवांना संपूर्ण पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या एडीसीपी वरुणा लिपी नागाईच यांनी योनी भागाला झालेल्या दुखापतीमुळे रक्तस्त्रावाच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितलं. एडीसीपींच्या माहितीनुसार, मृतासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्यामुळे तिच्या गुप्तांगाला जखम झाली, यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. 

आरोपी समीर मोहम्मदवर लैंगिक अत्याचार आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सुरूवातीला मृत पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुनाच्या आरोपाखाली एफआरआय दाखल करण्यात आला होता. नंतर शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी खुनाचा आरोप काढून लैंगिक अत्याचार आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : समजून घ्या: आता भाजपला फक्त 'एवढ्याच' खासदारांची गरज.. की ऑल सेट!

आरोपी मोहम्मद समीर हा सध्या पोलीस कोठडीत आहे. संबंधित प्रकरणात आरोपीने तावडीतून सुटण्यासाठी मृत तरुणीचा फोन देखील लपवला होता. पोलिसांकडे शवविच्छेदनाच्या पुराव्याच्या आधारे न्यायालयात हजर करण्यात आले. 

हे वाचलं का?