महिलेनं प्रेमप्रकरणातून तीन मुलांना मिठाईत विष मिसळून संपवलं, इंस्टाग्रामद्वारे पुरूषाशी संपर्क
Crime News : महिलेनं प्रेमप्रकरणातून तीन मुलांना मिठाईत विष मिसळून संपवलं. महिलेनं इंस्टाग्रामद्वारे पुरूषाशी संपर्क ठेवल्याची घटना आहे. दोघेही कथिक एकमेकांच्या प्रेमसंबंधात होेते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेनं प्रेमप्रकरणातून आपल्या तीन मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना
मिठाईत विषारी पदार्थ मिसळून तीन मुलांना संपवलं
Crime News : एका महिलेनं प्रेमप्रकरणातून आपल्या तीन मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रक्षाबंधनादिवशी आणलेल्या मिठाईत विषारी पदार्थ मिसळून तीनही मुलांना खाऊ घातले. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. तिघांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, मुलांच्यी आई इंस्टाग्रामद्वारे एका पुरूषाशी संपर्क साधत होती आणि ते कथितरित्या एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. मुलांना संपवण्यासाठी मिठाईत विषारी पदार्थ मिसळून खाऊ घातल्याची घटना आहे, ही घटना पंजाबच्या संगरूर येथील आहे.
हे ही वाचा : पुणे : इंजिनिअरने गरोदर पत्नीला गळा चिरुन संपवलं, अन् दुसऱ्या मजलीवरुन मारली उडी, कारण काय?
नेमकं प्रकरण काय?
संगरूरमधील भवानीगड येथील ही घटना असून 26 ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबात तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. मृत मुलांमध्ये अडीच वर्षांचा मुलगा, सहा वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश होता. सुरूवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचे मानले गेले आहे. संबंधित प्रकरणात जेव्हा पोलीसांनी अधिक सखोल केला असता, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिठाईत विषारी पदार्थ मिसळून तीन मुलांना देण्यामागील कारण काय?
मिठाईत विषारी पदार्थ मिसळून तीन मुलांना देण्यामागील नेमकं कारण काय? याचा पोलीस तपास करत आहेत. ज्या दुकानातून मिठाई विकत घेतली, तिथली मिठाई खाणाऱ्या इतर लोकांना संसर्क का झाला नाही? असा प्रश्न पोलिसांना पडला असता, त्यांनी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची निर्दोष मुक्तता, 'त्या' प्रकरणात न्यायालयाचा 17 वर्षांनंतर मोठा निर्णय
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, तपासात आईचे एका पुरुषासोबत असलेले कथित संबंध मुलांना संपवण्याचा कट आहे. या प्रकरणात पोलिसांनी आईला अटक केली आहे. अशातच तिच्या कथित प्रियकराचा शोध घेणे सुरू आहे. तीन निष्पाप मुलांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू आहे.
