वाशिम : नवऱ्याची बॉडी टॉवरला लटकलेली, तर बायको अन् दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत

मुंबई तक

Washim Crime News : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Washim Crime News
Washim Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

वाशिम : नवऱ्याची बॉडी टॉवरला लटकलेली

point

तर बायको अन् दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत

Washim Crime News, जका खान : वाशिम जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या तिवली गावात राहणाऱ्या 35 वर्षीय संतोष तुकाराम बकाल या तरुणाचा मृतदेह शेतातील वीज टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, तर या टॉवरपासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत त्याच्या पत्नीचा आणि दोन लहान मुलांचा मृतदेह तरंगताना दिसले. एकाच वेळी कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरित शिरपूर पोलिसांना दिली.

हेही वाचा : समजून घ्या: आता भाजपला फक्त 'एवढ्याच' खासदारांची गरज.. की ऑल सेट!

मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले सरकारी रुग्णालयात 

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक तपासाअंती हे मृतदेह संतोष बकाल याची पत्नी आणि दोन लहान मुलांचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस अधिकारी इमरान पठान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील पोलीस पाटलांनी दुपारी 4 च्या सुमारास या घटनेची सूचना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करून सर्व चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिले आहेत.

हेही वाचा : राजघराण्यातील व्यक्तीने दोन बायका केल्या, एकीने दुसरीवर गोळ्या झाडल्या

हे वाचलं का?