नर्सकडून आधी नवऱ्याला घटस्फोट आणि मग मोठं कांड
Crime News : मुंबईतील घटस्फोटित नर्स सना (वय 35) जिने आपल्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिले होते, मात्र तिचाच बॉयफ्रेंड फैजलने तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ठेवून पीडित महिला आपल्या प्रियकराशी लग्नाच्या हेतूने बिजनौरला गेली, मात्र नंतर तिच्यासोबत होत्याचं नव्हतं होऊन बसलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सनाने बॉयफ्रेंडशी लग्न करण्याच्या आशेनं नवऱ्याला तलाक दिला अन्...
लग्नाचा तगादा लावलेल्या सनाला फैजलने जागीच संपवलं
Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे सर्वांना मोठा हादरा बसला आहे. मुंबईतील घटस्फोटित नर्स सना (वय 35) जिने आपल्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिले होते, मात्र तिचाच बॉयफ्रेंड फैजलने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या प्रियकराशी लग्नाच्या हेतूने बिजनौरला गेली, मात्र नंतर तिच्यासोबत होत्याचं नव्हतं होऊन बसलं. हे प्रकरण बिजनौरच्या मंदावर पोलीस ठाणे परिसरातील आहे.
हे ही वाचा : समीरने 20 वर्षीय गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार केला, गुप्तांगातून रक्तस्त्राव अन्...
सनाने बॉयफ्रेंडशी लग्न करण्याच्या आशेनं नवऱ्याला तलाक दिला अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, सैफपूर खादर गावाचा रहिवासी असलेल्या फैजल अन्सारी हा मुंबईतील एका ,सलूनमध्ये काम करत होता. तिथे त्याची भेट एका ओशिवारा भागातील नर्स सना हिच्याशी झाली होती. सुरूवातीला त्यांची मित्री झाली. नंतर मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. असे बोलले जातेय, की महिला या नात्याबाबब खूपच संवेदनशील होती. फैजलसोबत भविष्यात लग्नाच्या आशेने तिने आपल्या नवऱ्याला तलाक दिला. तलाकनंतर तरुणाशी लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला, मात्र फैजल लग्नापासून दूर जाऊ लागला होता.
लग्नाचा तगादा लावलेल्या सनाला फैजलने जागीच संपवलं
फैजल ईदसाठी मुंबईहून बिजनौरमधील त्याच्या गावी आला होता. दरम्यान, 29 मे रोजी, ती महिलासुद्धा त्याला भेटण्यासाठी आणि त्यांच्या लग्नाची विचारपूस करण्यासाठी बिजनौरला गेली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, त्या महिलेनं फैजलवर लग्नाचा तगादा लावला होता. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, संतापलेल्या फैजलने तिला आपल्या बाईकवरून मंदावर पोलीस ठाणे परिसरातील फतेहपूर सभाचंदच्या जंगलात नेले. तिथे, उसाच्या शेतात तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि गुन्ह्याबद्दल कोणालाही कळू नये म्हणून तिचा मृतदेह शेतातच पुरला. गुन्हा केल्यानंतर, आरोपी मुंबईला परतला आणि आपला दैनंदिन कारभार सुरू झाला.
दरम्यान, तेव्हा महिलेच्या कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा चिंता वाढली. व्यापक शोधानंतर, 2 जून रोजी मुंबईत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान, महिलेचे शेवटचे लोकेशन आणि कॉल डिटेल्समुळे पोलिसांना फैजवर संशय होता. याच संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.









