20 तासांपूर्वीची पोस्ट पाहून विश्वास बसणार नाही, छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या
tv actress sanchita ugale dies by suicide : वसईतील नालासोपारा येथे हिंदी टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, तिच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच्या आनंदी व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
20 तासांपूर्वीची पोस्ट पाहून विश्वास बसणार नाही,
छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल
tv actress sanchita ugale dies by suicide : वसईच्या नालासोपारा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री संचिता उगाले हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून, एका तरुण अभिनेत्रीने अचानक जीवन संपवल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संचिताने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले, याचे गुपित अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा : 'मी भवानीला मारुन टाकलं', एक कॉल आला अन् बॉयफ्रेंडही बेशुद्ध अवस्थेत तिथेच सापडला
संचिताची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
विशेष म्हणजे, संचिताच्या निधनापूर्वीची तिची सोशल मीडियावरील सक्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आत्महत्या करण्याच्या अवघ्या 20 तासांपूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती 'डफलीवाले डफली बजा' या प्रसिद्ध गाण्यावर अतिशय आनंदाने डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिचे हास्य आणि तिचा आनंद पाहून तिने काही तासांतच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पंढरपुरातील आंदोलनावेळी Rohit Pawar यांचा परिवार भावूक, पत्नी कुंती यांच्यासह मुलंही रडली









