'मी भवानीला मारुन टाकलं', एक कॉल आला अन् बॉयफ्रेंडही बेशुद्ध अवस्थेत तिथेच सापडला
Crime News : 22 वर्षीय तरुणीची तिच्या राहत्या घरी हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, प्रियकराने फोन करून स्वतःच हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी मृतदेह सापडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी भवानीला मारुन टाकलं', एक कॉल आला अन्
बॉयफ्रेंडही बेशुद्ध अवस्थेत तिथेच सापडला
Crime News : एका 22 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एस. भवानी असे मृत तरुणीचे नाव असून, ती एका मोबाईल शोरूममध्ये बिलिंग असिस्टंट म्हणून काम करत होती आणि सोबतच आपले शिक्षणही पूर्ण करत होती. शुक्रवारी सकाळी पोलीस जेव्हा तिच्या भाड्याच्या घराचा दरवाजा तोडून आत शिरले, तेव्हा भवानी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली, तर तिचा प्रियकर चंद्रशेखर ऊर्फ चंदू हा तिच्या शेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला. या घटनेमुळे भवानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा : सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!
"तुझ्या मुलीची हत्या केली, तुला जे करायचंय ते कर,"
भवानीचे वडील श्रीनिवास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना भवानी आणि चंद्रशेखर यांच्यातील संबंधांची माहिती नुकतीच मिळाली होती. हे संबंध मान्य नसल्यामुळे त्यांनी भवानीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी सकाळी एका नातेवाईकाने भवानी आणि चंद्रशेखरचा एकत्र फोटो व्हॉट्सॲपवर पाहिल्यानंतर त्यांना काळजी वाटू लागली. श्रीनिवास यांनी भवानीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. त्यानंतर त्यांनी चंद्रशेखरला संपर्क साधला, तेव्हा त्याने अत्यंत निर्दयीपणे फोन उचलून, "मी तुझ्या मुलीची हत्या केली आहे, तुला जे करायचे आहे ते कर," अशी धक्कादायक कबुली दिली आणि त्यानंतर त्याने पोलीस स्वतःच आपल्याला पकडतील असेही सांगितले.
हेही वाचा : सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!









