सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!
Sangli Crime News : सांगलीत हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या हत्येतील मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला पोलिसांनी कर्नाटक सीमेवरील एका लॉजवरून अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या
आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!
Sangli Crime News : सांगली शहरात घडलेल्या वेदांत बंडगर या लहान मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. कर्नाटक सीमेवरील एका लॉजवर आपल्या मैत्रिणीसह लपून बसलेल्या नीलेश गडदेला पोलिसांनी एका धाडसी कारवाईत ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता, मात्र पोलिसांच्या पाच पथकांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर त्याला शोधण्यात यश आले. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : सोलापूर हळहळलं, विहिरीत पिकअप कोसळून 8 भाविकांचा मृत्यू; माळशिरसमधील घटना
कामाचा ठेका मिळण्यावरुन सुरु झालेला वाद
या भीषण गुन्ह्याच्या मुळाशी रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून सुरू असलेला वाद असल्याचे तपासातून समोर आले आहे. मालधक्क्याच्या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे होता आणि हे काम सोडावे म्हणून निलेश गडदे त्यांच्यावर सातत्याने दबाव आणत होता. बुधवारी रात्री गडदेने आपल्या साथीदारांसह खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धमकावले आणि खंडणीची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे पोहोचले आणि गडदेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, ज्यात हमालांनी गडदे समर्थकांच्या वाहनांवर दगडफेक केली होती.
हेही वाचा : तरुण भाचीसोबत बोलायचा, मामाने केलं कांड; नेमकं काय घडलं?









