ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडली? शिवसेनेत नवे राजकीय समीकरण
Omraje Nimbalkar : ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत गेलेत. अर्थात यावर अजूनही अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत नाही. मात्र तरीही शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी ठरल्यात जमा असल्याची चर्चा समोर आली. यातलं सर्वाधिक शॉकिंग नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर होय.
ADVERTISEMENT
Omraje Nimbalkar : ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत गेलेत. अर्थात यावर अजूनही अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत नाही. मात्र तरीही शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी ठरल्यात जमा असल्याची चर्चा समोर आली. यातलं सर्वाधिक शॉकिंग नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर होय. धाराशिवची सर्वात अधिक भावनिक लाटेवर निवडणूक झाली होती. ओमराजेंना लोकांनी फक्त भाषणं ऐकूण आणि इमोशनली भरभरून मतं दिली होती. सगळी ताकद विरोधात एकवटली असतानाही ओमराजेंना चार लाखांहून अधिक मतांनी जिंकून दिलं होतं. ओमराजेंनी प्रेझेन्स ही गोष्ट कमालीची होती, पण अशातच आता ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याच्या चर्चांना उधाण आलंय.









