भोंदू बाबाकडून महिलेवर बलात्कार अन्....

मुंबई तक

Crime News : काळी सावली आणि नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली असलेल्या महिलेच्या समस्या सोडवण्यासाठी भोंदूने सुमारे 40 हजार रुपये घेतले, नंतर लैंगिक अत्याचार करण्यात आले, या घटनेनं परिसर हादरून गेला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पुजा पाठ करण्याच्या हेतूने पीडितेवर अश्लील कृत्य 

point

आरोपीने पीडितेवर हल्ला केला

Crime News : कानपुरच्या देहात जिल्ह्यातील देवराहत पोलीस ठाणे परिसरातील एका बोतल बाबा विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी हरिओम यादव उर्फ बोतल बाबांसह इतर पाच लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचा असा आरोप की, काही दिवसांपासून संबंधित बाबाने तिला काळी सावली आणि नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली असल्याचं सांगितलं. ही समस्या सोडवण्यााच्या नावाखाली तिच्याकडून सुमारे 40 हजार रुपये घेतले. 

हे ही वाचा : रभणी: मंदिराच्या गाभाऱ्यात काळाचा घाला, एका क्षणात कसा गेला 6 जणांचा जीव?

पुजा पाठ करण्याच्या हेतूने पीडितेवर अश्लील कृत्य 

संबंधित महिलेनं दावा केला की, पुजा पाठ करण्याच्या हेतूने तिची अब्रु लुटली. या प्रकरणात तिचा असा आरोप होता, तिथे पोहोचल्यानंतर पीडितेवर अश्लील कृत्य करण्यात आले, नंतर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडितेनं दावा केला, जेव्हा तिने प्रतिकार केला असता, भोंदू बाबा आणि साथीदारांनी मिळून पीडितेवर हल्ला केला. 

आरोपीने पीडितेवर हल्ला केला

पीडितेनं आरोप केला की, प्रतिकार केल्यावर तिच्यावर हल्ला केला. इतकंच नाही,तर आरोपीने तिचा गळा दाबून तिला ठार केले. महिलेल्या सांगण्यानुसार, तिने आपली आरोपीच्या तावडीतून कशी बशी सुटका केली, नंतर स्वत:चा जीव वाचवत तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा : सांगली: केबिनमध्ये तासाला 300 ते 800 रुपयांचा रेट, कचरापेटीत कंडोम अन्..

आरोपी बाबाविरूद्ध इतर चार ते पाच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील केली. अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरील तपास, मिळवलेले पुरावे आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात आला. 

हे वाचलं का?