Govt Jobs : हेलिकॉप्टर कंपनीत काम करायचंय? मग 'इथे' अर्ज कराच, बक्कळ पगार अन्...

मुंबई तक

पवनहंस लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : हेलिकॉप्टर कंपनीत काम करायचंय?

point

मग 'इथे' अर्ज कराच

point

बक्कळ पगार अन्...

Government Jobs : भारत सरकारच्या 'मिनीरत्न' दर्जाच्या 'पवन हंस लिमिटेड' या हेलिकॉप्टर वाहतूक कंपनीत विविध पदांच्या एकूण 22 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत असिस्टंट (HR&A), ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल), क्वालिटी असिस्टंट, असिस्टंट (CAMO), स्टेशन-इन-चार्ज आणि ट्रेनी टेक्निशियन अशा एकूण 7 वेगवेगळ्या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व जागा दिल्ली येथील कार्यालयासाठी असून, यासाठी इच्छुक उमेदवारांना 10 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेद्वारे नियमित (Regular) आणि कंत्राटी (Contractual) अशा दोन्ही पद्धतींच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,500 रुपये ते 27,000 रुपये इतके मूळ वेतन (Basic Pay) दिले जाईल. शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर वेगवेगळ्या पदांनुसार पात्रता निकष बरेच भिन्न आहेत. यामध्ये साध्या पदवीधरांपासून (Graduate) ते विमान वाहतूक क्षेत्रातील विशेष डिप्लोमा (Specialised Aviation Diplomas) धारक उमेदवारांपर्यंत सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या भरतीबाबतची अधिकृत व सविस्तर माहिती कंपनीचे संकेतस्थळ www.pawanhans.co.in यावर उपलब्ध आहे.

हे ही वाचा : 'कसली ही न्यायव्यवस्था?..' पवनराजे हत्याकांड निकालावर ठाकरेंचा 'तो' नेता संतापला

अर्जाचे शुल्क किती?

अर्ज प्रक्रियेसाठी सर्वसाधारण उमेदवारांना जीएसटीसह 354 रुपये इतके अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwD) प्रवर्गातील उमेदवारांना या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. पवन हंस लिमिटेड ही भारत सरकारची एक अग्रगण्य हेलिकॉप्टर सेवा पुरवणारी संस्था असून, तिच्या ताफ्यात 5 ते 26 आसनी क्षमतेची 50 हून अधिक हेलिकॉप्टर्स कार्यरत आहेत.

हे ही वाचा : 'कलयुगात वाईटाला बळ...' पवनराजे हत्याकांडाच्या निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया

असा करा अर्ज?

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींची सांगड घालणारी आहे. उमेदवारांनी केवळ ऑनलाईन अर्ज सादर करणे पुरेसे नाही, तर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची स्वाक्षरी केलेली छापील प्रत (Hard Copy) दिलेल्या मुदतीपूर्वी कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. जे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत, ते थेट ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. भरलेले अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांनी 'JGM (HR&A), पवन हंस लिमिटेड, उत्तर क्षेत्र, रोहिणी हेलिपोर्ट, सेक्टर 36, रोहिणी, नवी दिल्ली -110085' या पत्त्याचा वापर करावा.
 

हे वाचलं का?