'कसली ही न्यायव्यवस्था?..' पवनराजे हत्याकांड निकालावर ठाकरेंचा 'तो' नेता संतापला

मुंबई तक

Pawanraje Murder case : ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर आठ आरोपींची निर्दोषपणे मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या या निकालावरून आता रान पेटू लागलं आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरती पोस्ट करून कसली ही न्यायव्यस्था? असा प्रश्नात्मक जाब विचारला आहे. 

ADVERTISEMENT

 Pawanraje Nimbalkar murder case
Pawanraje Nimbalkar murder case
google news

बातम्या हायलाइट

point

अंबादास दानवे याची पोस्ट जशीच्या तशी 

point

मुक्त झालेल्या आरोपींची नावे समोर 

Pawanraje Murder case : ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर आठ आरोपींची निर्दोषपणे मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या या निकालावरून आता रान पेटू लागलं आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरती पोस्ट करून कसली ही न्यायव्यस्था? असा प्रश्नात्मक जाब विचारला आहे. 

हे ही वाचा : ओमराजे कोर्टाबाहेर आले, ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

अंबादास दानवे याची पोस्ट जशीच्या तशी 

अंबादास दानवे यांनी पोस्ट करत लिहिलं की, 'कसली ही न्यायव्यवस्था? पवनराजे निंबाळकर यांच्यासह 1 जणांची राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या होते, आणि प्रकरणात ढीगभर पुरावे असतानाही आरोपी निर्दोष सुटतात. हा निकाल पाहून मनात संताप, चीड आणिअस्वस्थता याशिवाय काहीच उरत नाही. धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत आहे, तरीही न्याय मिळत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अशा निकालांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आज प्रश्न फक्त एका खटल्याचा नाही, तर न्यायाचाआहे,' अशी फेसबुकवर पोस्ट शेअर करून अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला. 

मुक्त झालेल्या आरोपींची नावे समोर 

मुक्त झालेल्या आरोपींची नावे ज्यात महिलं नाव हे  डॉ. पद्मसिंह पाटील असे आहे. सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटे पांडे हे आरोपी निर्दोष सुटले आहेत. 

हे ही वाचा : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला, पद्मसिंह पाटील...

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना 3 जून 2006 रोजी पनवेलच्या कळंबोली परिसरातील एक्सप्रेस हायवेवर पवनराजे निंबाळकर यांची कार अडवून त्यांच्यावर हल्ला केला. नंतर गोळीबार करत त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचा कार चालक समद काझी देखील मृत्यू झाला. सीबीआयने प्रकरणात लक्ष घालून हत्येसाठी 25 लाखांची सुपारी दिली होती, असं सांगितलं होतं. ओमराजे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या प्रदिर्घ न्यायालयीन लढाईनंतर आज सीबीआयने 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली.  

हे वाचलं का?