लग्न होताच नवविवाहिता पडली दीराच्या प्रेमात, नवऱ्याला समजलं अन् घडलं भयंकर

मुंबई तक

आग्रा येथील एका नवविवाहितेचे लग्नाच्या तीनच महिन्यात दीरासोबत अनैतिक संबंध जुळले. ती प्रेमात इतकी आकंठ बुडाली की दीरासोबत मिळून तिने नवऱ्याचा काटा काढला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

लग्न होताच नवविवाहिता पडली दीराच्या प्रेमात

point

नवऱ्याला समजलं अन् घडलं भयंकर

Crime News : अनैतिक संबंधातून लहान भावानेच वहिनीच्या मदतीने मोठ्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनी मिळून मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जवळच असलेल्या शेतात फेकून दिला. बुधवारी शेताच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. यावरुन त्याला क्रूरपणे मारण्यात आल्याचं दिसून आलं. मृतदेहाची ओळख सोलू (32) म्हणून पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही घटना आहे.

नवविवाहित वहिनीसोबत...

मृत सोलू याचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या घरात सोलूचा लहान भाऊ भोला हा देखील एकत्र राहत होता. लग्न झाल्यापासूनच भोला आणि त्याच्या नवविवाहित वहिनीमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. काही दिवसांनी या प्रेमसंबंधांची कुणकुण सोलूला लागली आणि त्याने या सर्व प्रकाराला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या सोलूला कायमचे बाजूला करण्यासाठी त्याची पत्नी आणि लहान भाऊ भोला या दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.

हे ही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्याकांड, आरोपींनी आधीच भोगला आहे 'इतका' तुरुंगवास, आज काय होणार?

पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न

योजनेनुसार दोघांनी मिळून आधी सोलूची हत्या केली आणि रात्रीच्या अंधारात त्याचा मृतदेह घराशेजारील शेतात फेकून दिला. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःवर संशय येऊ नये म्हणून दोघेही अत्यंत हुशारीने वागत होते व पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संशयाच्या आधारे पोलिसांनी जेव्हा त्यांची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा पोलिसांच्या खाक्यासमोर त्यांचा धीर सुटला आणि दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावर पोज द्यायला गेला अन् भयंकर घडलं, तरुण बिझनेसमन जीवानिशी गेला

दोघांना अटक

अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यामुळे सोलू सातत्याने विरोध करत होता, म्हणूनच त्याला वाटेतून हटवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे आरोपी भोला आणि सोलूच्या पत्नीने पोलीस चौकशीत सांगितले. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून दोघेही पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, आग्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या 24 तासांच्या आत या संपूर्ण थराराचा पर्दाफाश केला असून, आरोपी भाऊ भोला आणि मृत सोलूच्या पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
 

हे वाचलं का?