प्रसिद्ध डॉक्टरने 45 वर्षीय मोलकरणीला संपवले, कारण वाचून हादरुन जाल

मुंबई तक

एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या डॉक्टरने त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केली आहे. यामागील एक धक्कादायक कारण समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

प्रसिद्ध डॉक्टरने 45 वर्षीय मोलकरणीला संपवले

point

कारण वाचून हादरुन जाल

Crime News : एका उच्चभ्रू सोसायटीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित डॉक्टरने 45 वर्षीय मोलकरणीची बॅट आणि सुऱ्याने वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (18 जून) आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. मीना असे मृत महिलेचे नाव असून, ती गेल्या अनेक वर्षांपासून या डॉक्टरच्या घरी घरकाम करत होती. तिचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह घराच्या गच्चीवर आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या माऊंट कैलास परिसरातील ही घटना आहे. मनिष गुप्ता असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे.

आधी बॅटने हल्ला अन् नंतर सुऱ्याने हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 11:36 वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षाला (PCR) या घटनेची माहिती देणारा फोन आला होता. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिथे पोहोचले असता आरोपी डॉक्टर मनिष गुप्ता हा मृत मीनाच्या मृतदेहाशेजारीच बसलेला आढळला. पोलिसांनी त्याला जागेवरच ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, आपण आधी मीनावर बॅटने हल्ला केला आणि नंतर सुऱ्याने वार करून तिची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन्ही हत्यारे जप्त केली आहेत.

हे ही वाचा : फॉर्च्युनरमध्ये कोंडून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर

'ती काळी जादू करायची'

प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टर मनीष गुप्ता याने धक्कादायक दावा केला आहे. मृत मीना ही घरात 'करणी' (काळी जादू) करत होती, ज्यामुळे त्याच्या घरातील शांतता भंग पावली होती आणि कुटुंबातील सदस्य मानसिक त्रासाला सामोरे जात होते, असा आरोप त्याने केला. मात्र, तपास अधिकाऱ्यांना या दाव्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही. पोलिसांनी सांगितले की, डॉक्टर गुप्ता हा गेल्या काही काळापासून नैराश्याने (डिप्रेशन) ग्रस्त आहे आणि चौकशीदरम्यान तो सतत आपली विधाने बदलत आहे. त्यामुळे हत्येमागचे नेमके आणि खरे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हे ही वाचा : Personal Finance: रिडेव्हलपमेंटमध्ये ‘हे’ असतात घरमालकांचे हक्क, अजिबात घेऊ नका माघार..

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर...

पोलिसांनी सांगितले की, हत्येचा मुख्य हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून, त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे अन्वेषण पथकाला पाचारण करण्यात आले होते. याशिवाय पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून स्थानिक नागरिकांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच याच परिसरात एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या मुलीवर माजी घरगड्याने बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ घडलेल्या या दुसऱ्या हाय-प्रोफाइल गुन्ह्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
 

हे वाचलं का?