नवऱ्याचे महिलेसोबत संबंध, पत्नीच्या ज्यूसमध्ये उंदराचं औषध मिसळलं अन्..
Crime News : नवऱ्याने आपल्या भोळ्या भाबड्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी नवऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मागील चार वर्षांपासून संतोषचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. आपल्या बायकोला नात्यातून दूर करण्यासाठी त्याने तिची हत्या केल्याचा संशय आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीच्या ज्यूसमध्ये नवऱ्यानं उंदीर मारण्याचं औषध मिसळलं अन्..
नवऱ्यानं हत्येचा रचला बनाव
Crime News : नवऱ्याने आपल्या भोळ्या भाबड्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी नवऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नवऱ्याची ओळख संतोष असून तो कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील आहे. मागील चार वर्षांपासून संतोषचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. आपल्या बायकोला नात्यातून दूर करण्यासाठी त्याने तिची हत्या केल्याचा संशय आहे.
हे ही वाचा : पुणे: आईच्या लिव्ह-इन पार्टनरनं 3 वर्षांच्या चिमुकल्याची केली निर्घृण हत्या
पत्नीच्या ज्यूसमध्ये नवऱ्यानं उंदीर मारण्याचं औषध मिसळलं अन्..
आरोपी नवरा संतोष म्हणाला की, अधिक मासाचा महिना सुरू आहे, आपण मारकुंबी गावातील चांमुडेश्वरी मंदिरात जाऊयात. बायका मंदिरात जाण्यास तयार झाली. इतक्यात संतोष पत्नी सक्कुबाईला मंदिरात घेऊन गेला आणि ज्यूस प्यायला दिला. त्यात त्याने उंदीर मारण्याचे औषध मिसळले. ज्यूस प्यायल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली होती. संतोषने सक्कुबाईला एका रस्त्याच्या बाजूला सोडले, नंतर त्याने पोलिसांना फोन केला आणि तिचा अपघात झाल्याची माहिती दिली.
नवऱ्यानं हत्येचा रचला बनाव
संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, संतोष पटायात याने आपल्या पत्नीला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी हे कांड केलं. संतोषवर हत्येचा ठपका पडू नये म्हणून त्याने या हत्येचा दुर्घटनेचा बनाव रचण्याचा प्लान केला. अखेर हत्येचा खुलासा झाला आणि आरोपीला अटक करण्यात आली.
हे ही वाचा : नराधमानं मुलीचं तोंड दाबून उसाच्या शेतात नेलं अन्..
पोलिसांच्या माहितीनुसार, सक्कुबाईचा मृतदेह पाहून संतोषवर हत्येचा संशय बळावला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बेलगावी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज येथे पाठवण्यात आला. सुरूवातीला शवविच्छेदन अहवालातून महिलेची हत्या करण्यात आल्याचं समजलं. आरोपी नवरा संतोषने हत्येचा कबुलीनामा दिला.









