Govt Jobs : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी, 80 हजारांहून अधिक पगार

मुंबई तक

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 सप्टेंबर आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार रुपयांहून अधिक पगार मिळणार आहे.

ADVERTISEMENT

RCF Recruitment
RCF Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी

point

80 हजारांहून अधिक पगार

point

जाणून घ्या पात्रतेचे निकष

RCF Recruitment : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF Ltd.) द्वारे मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या एकूण 94 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 60% गुणांसह संबंधित शाखेतील B.E./B.Tech. पदवी, किंवा इंग्रजीसह हिंदीतील पदव्युत्तर पदवी, अथवा CA/CMA किंवा विज्ञान, अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रातील पदवीसह MBA/MMS/PGDM असणे आवश्यक आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% गुणांची अट ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवारांचे वय 27 वर्षांपर्यंत असणे गरजेचे असून, यामध्ये नियमानुसार SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का

ट्रेनिंग दरम्यान मिळणार सुविधा

अर्जासाठी General, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, PWD, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. निवड झालेल्या मॅनेजमेंट ट्रेनी उमेदवारांना एका वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत दरमहा 60,000 रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. तसेच ट्रॉम्बे किंवा थळ येथे नियुक्ती मिळाल्यास कंपनीच्या हॉस्टेलमध्ये मोफत राहण्याची सुविधा, स्वतःसाठी RCF रुग्णालयात वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा संकुलाचा लाभ देखील मिळेल.

हे ही वाचा : 13 वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला आरोपी जिवंत सापडला; न्यायालयाने तुरुंगात पाठवलं

वेतन किती मिळणार?

एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना E1 ग्रेडमध्ये समाविष्ट केले जाईल, जिथे 40,000 ते 1,40,000 रुपयांची वेतनश्रेणी लागू होईल. यात मूळ वेतनासह महागाई भत्ता, इतर भत्ते आणि घरभाडे भत्ता मिळून सुरुवातीला दरमहा सुमारे 86,320 रुपये एकूण वेतन मिळणार आहे. उत्तम कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.