13 वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला आरोपी जिवंत सापडला; न्यायालयाने तुरुंगात पाठवलं

मुंबई तक

Crime News : आग्र्यात फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपीला 13 वर्षांपूर्वी अधिकृत नोंदीत मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र, तक्रारदाराने त्याला स्कूटरवरून जाताना पाहून फोटो काढला आणि हा पुरावा न्यायालयात सादर केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

13 वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला आरोपी जिवंत सापडला

point

न्यायालयाने तुरुंगात पाठवलं

Crime News : आग्र्यातील गांधी नगर परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपी ताराचंद शर्मा याला तब्बल 13 वर्षांपूर्वी अधिकृत नोंदीत मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र, तो जिवंत असल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळालं. तक्रारदार राज कुमार वर्मा यांनी ताराचंद शर्माला गांधी नगर परिसरात स्कूटरवरून जाताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी त्याचा फोटो काढला. हा फोटो आणि इतर पुरावे पुढे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : सणाच्या तोंडावर अभिनेत्रीची मोठी आर्थिक फसवणूक, सायबर भामट्यांनी बँक खाते केले रिकामे!

बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप

सोमवारी गांधी नगर येथील रहिवासी ताराचंद शर्मा याने विशेष मुख्य न्यायिक दंडाधिकारी शिव नंद गुप्ता यांच्या न्यायालयात आत्मसमर्पण केलं. त्याने न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. तक्रारदाराच्या वतीने ज्येष्ठ वकील समीर भटनागर यांनी बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1 सप्टेंबर 1999 रोजी फसवणुकीच्या प्रकरणात ताराचंद शर्माला न्यायालयाने समन्स बजावलं होतं. त्याच्यावर बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप होता. आरोपीला उच्च न्यायालयातूनही दिलासा मिळाला नव्हता.

हेही वाचा : सणाच्या तोंडावर अभिनेत्रीची मोठी आर्थिक फसवणूक, सायबर भामट्यांनी बँक खाते केले रिकामे!