सणाच्या तोंडावर अभिनेत्रीची मोठी आर्थिक फसवणूक, सायबर भामट्यांनी बँक खाते केले रिकामे!
मुंबईतील एका अभिनेत्रीची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. रक्षाबंधनची खरेदी करायला गेल्यावर तिचे अकाऊंट रिकामे झाल्याचे तिला आढळून आले. यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत तिने तक्रार नोंदवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सणाच्या तोंडावर अभिनेत्रीची मोठी आर्थिक फसवणूक
सायबर भामट्यांनी बँक खाते केले रिकामे!
Cyber fraud With Actress : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती (राखी) दधीच या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या असून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. चित्रीकरण संपवून घरी परतल्यानंतर त्या रक्षाबंधनाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र, दुकानात पेमेंट करताना त्यांचे बँक खाते पूर्णपणे रिकामे झाल्याचा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
सणाच्या तोंडावर खाते रिकामे
आपल्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती दधीच यांनी तत्काळ बँकेत धाव घेऊन खात्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन या संपूर्ण घटनेची अधिकृत तक्रार नोंदवली आहे. बँकेतून अचानक पैसे गायब झाल्याने आणि सणाच्या तोंडावरच खाते शून्य झाल्याने अभिनेत्रीने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : चौकशीतून पेपर फुटल्याचे समोर, MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार
सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
या सायबर फसवणुकीचा कटू अनुभव ज्योती यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्टद्वारे शेअर केला आहे. आपले कष्टाचे पैसे परत मिळावेत यासाठी त्यांनी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे आर्त हाक मारली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या या पोस्टनंतर सायबर सुरक्षेचा आणि नागरिकांच्या ऑनलाइन पैशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
हे ही वाचा : सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून हत्या, भावाला 'तो' संशय अन् सगळंच संपलं!
पैसे परत मिळणार का?
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, तक्रार दाखल करून घेण्यात आली असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायबर गुन्ह्यांमधील गुंतागुंतीमुळे पैसे परत मिळतीलच असे ठामपणे सांगता येत नाही; पैसे परत मिळण्याची शक्यता असूही शकते आणि नाहीही, असे उत्तर पोलिसांनी दिले असल्याचे राखी यांनी सांगितले. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
