सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून हत्या, भावाला 'तो' संशय अन् सगळंच संपलं!
एका भावाने चारित्र्याच्या संशायवरुन आपल्या दोन बहिणींची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपी भावाला उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून हत्या,
भावाला 'तो' संशय अन् सगळंच संपलं!
Crime News : रक्षाबंधनच्या आधी भाऊ आणि बहिणींच्या नात्यातील संघर्षाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका भावाने आपल्या दोन विवाहित बहिणींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील मोठ्या बहिणीची भररस्त्यात ई-रिक्षात असताना, तर लहान बहिणीची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. या अंधाधुंद गोळीबारात लहान बहिणीचा पतीही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी भावाला उशिरा रात्री अटक केली आहे. उत्तराखंडच्या रुडकी परिसरातील ही घटना आहे.
आधी मोठ्या बहिणीला संपवले, नंतर...
संगीता (वय 50) आणि तिची लहान बहीण पुष्पा (वय 42) या दोन्ही विवाहित महिला रुडकीतील वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या. मंगळवारी (25 एप्रिल) रात्रीच्या सुमारास संगीता ई-रिक्षाने घरी परतत असताना रस्ता संथ होताच आरोपी भावाने तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तिथे थांबला नाही, तर थेट दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या लहान बहिणीच्या घराकडे निघून गेला.
हे ही वाचा : चौकशीतून पेपर फुटल्याचे समोर, MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार
दरवाजा उघडताच झाडल्या गोळ्या
पहिल्या घटनेनंतर अवघ्या 15 मिनिटांत आरोपीने लहान बहीण पुष्पा हिच्या घराचा दरवाजा ठोठावला. पुष्पाने दरवाजा उघडताच त्याने तिच्यावरही थेट दोन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने घरात प्रवेश करून पुष्पाचा पती संदीप याच्यावरही गोळी झाडली, जी त्याच्या खांद्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आल्याने आरोपीने तिथून पळ काढला.
हे ही वाचा : रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश, औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द
चारित्र्यावर संशय
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमी संदीपला उपचारासाठी रुडकीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ विवेक हा आपल्या दोन्ही बहिणींच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
