चौकशीतून पेपर फुटल्याचे समोर, MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार

मुंबई तक

MPSC drug inspector group b recruitment cancelled : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे समोर आले.

ADVERTISEMENT

MPSC drug inspector group b recruitment cancelled
MPSC drug inspector group b recruitment cancelled
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पेपर फुटला, MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार

point

पेपर फुटून एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे समोर

MPSC drug inspector group b recruitment cancelled : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगामार्फत या पदासाठी २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?

परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ईमेलद्वारे तक्रारी अन् गैरप्रकार झाल्याचे समोर 

यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ जुलै २०२६ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. २२ जुलै रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या ३ अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ईमेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या.

हेही वाचा : 'पप्पा, मला सोडून जाऊ नका', कुणालच्या मावशीने आणखी काय सांगितलं?