'पप्पा, मला सोडून जाऊ नका', कुणालच्या मावशीने आणखी काय सांगितलं?
kunal chandgude case : कुणाल चांदगुडे आत्महत्या प्रकरणात त्याच्या मावशी कल्याणी बरडे यांनी कुटुंबातील वाद, गैरसमज आणि कुणालच्या वडिलांशी असलेल्या नात्याबाबत माहिती दिली. कुणालला वडिलांना पुन्हा घरी आणायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'पप्पा, मला सोडून जाऊ नका'
कुणालच्या मावशीने आणखी काय सांगितलं?
kunal chandgude case :कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. त्याने केवळ आयफोनसाठी टोकाचं पाऊल उचललं होतं का, की त्यामागे कुटुंबातील वाद आणि वाढलेले गैरसमज कारणीभूत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगिता चांदगुडे यांच्या नात्यात दरी निर्माण झाली होती का? याबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कुणालची मावशी कल्याणी बरडे यांनी मुंबई Tak सोबत संवाद साधला.
हेही वाचा : आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला, आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र
आयफोनबाबत मावशीचा खुलासा
त्यांनी सांगितले की, कुणालच्या वडिलांचा आर्थिक पार्श्वभूमी गरीब नव्हती. ते ड्रायव्हर म्हणून काम करत असले तरी त्यांच्या कुटुंबाकडे शेती होती आणि त्यातून उत्पन्न मिळत होते. त्यामुळे कुणालला आयफोन घेऊन देण्यामागे मोठा आर्थिक प्रश्न असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. कुणालला शिक्षणासाठी आणि क्लाससाठी फोनची गरज होती, त्यामुळे त्याला फोन घेऊन देण्यात आला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला, आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र
